सुगी ग्रुप गेली ३५+ वर्षे बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. आज मुंबई मधील सर्वात वेगाने वाढणाऱ्या बांधकाम व्यावसाईकांपैकी आम्ही एक आहोत. विश्वास, चिकाटी, सचोटी आणि पारदर्शकतेने सुगी ग्रुपने प्रत्येक वेळी निष्पक्ष, प्रामाणिक व्यवहारांमुळे लोकांच्या मनात सद्भावना निर्माण केली आहे.
म्हणूनच सर्वोत्तम पुनर्विकास प्रकल्प विकासक व पुनर्विकास विशेषज्ञ म्हणून सुगी ग्रुपची ख्याती आहे. मुंबईचा मध्य समजल्या जाणाऱ्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज पार्क या क्षेत्रातून आम्ही आमचे काम लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. या भागाशी आमची एक नाळ जोडली गेली आहे. शिवाय या भागाला एक सांस्कृतिक वारसाही आहे.
अतिशय समृद्ध आणि वैभवशाली संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी व तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी “सुगी परिवार” एक छोटासा प्रयत्न आहे.
कलाक्षेत्रातील सुप्रिसिद्ध आणि दिग्गज व्यक्तिमत्वांनी छत्रपती शिवाजीमहाराज पार्कला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे.
अशा समृद्ध वास्तु मध्ये आमच वास्तव्य आहे आणि त्यामुळेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क च सामाजिक देणं लागतो या भावनेतून या ख्यातनाम कलाकारांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही
“छत्रपती शिवाजी महाराज पार्क” या नावाने कार्यक्रम रूपी शृंखला.
अविस्मरणीय क्षण
फिर रफी, जुलै २०२४
तीन दिवसांचा विशेष संगीत महोत्सव
मोहम्मद रफी यांच्या आवाजातील विविधता आणि अष्टपैलुपणामुळे ते भारतीय संगीताच्या जगतातील एक अमूल्य रत्न ठरले. कोणत्याही अभिनेत्याच्या व्यक्तिरेखेप्रमाणे आवाजाला साजेसा बदल करण्याची त्यांची अविस्मरणीय कला आणि लिप-सिंकिंगमधील उत्कृष्टता त्यांना संगीतविश्वात अद्वितीय स्थानदेते. त्यांच्या या अनमोल योगदानाला आदरांजली देण्यासाठी सुगी कडून मुंबईतील विविध नाट्यगृहात तीन दिवसीय भव्य संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक श्रीकांत नारायण, त्यांच्या सहगायिका सरिता राजेश, आणि त्यांच्या समूहाच्या अप्रतिम सादरीकरणाने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध झाले. त्या सुरेल संध्याकाळीचे निवेदनश्री. अमित काकडे यांनी आपल्या सुरेल आवाजात केले. या महोत्सवाच्या प्रत्येक क्षणाने प्रेक्षकांची मनं मोहून टाकली आणि अखेरीस मोहम्मद रफी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत याआनंदमयी सोहळ्याचा समारोप झाला.
अभंगवारी, जुलै २०२४
भक्तिसंगीतांची वारी.
सुगी प्रस्तुत अभंगवारी, पंडित डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त, वसंतोत्सव आणि श्री. राहुल देशपांडे यांनी आयोजित केलेला एक हृदयस्पर्शी संगीत कार्यक्रम. शिव (Sion) येथील प्रतिष्ठित श्री. षण्मुखानंद चंद्रशेखरेन्द्र सरस्वती सभागृहात हा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. राहुल देशपांडे आणि त्यांच्या गायन समूहाच्या उपस्थितीने एक मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण केले. प्रेक्षकांच्या हृदयात प्रिय विठ्ठल रुक्मिणीचे दिव्य प्रतिबिंब उमटवले जणू काही त्यांची उपस्थिती लोकांच्या मनात अवतरली होती. या अद्भुत संगीत संध्येचा भक्तीभावाने आणि श्रद्धेने समारोप झाला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या भक्तिपूर्ण समारंभात सहभागी होण्याचा आम्हाला मनापासुन आनंद आहे.